मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्प समर्पित करत असल्याचं जाहीर केलं. तर, अजित पवार यांचं स्मारक उभारण्याची तसेच त्यांच्या नावानं पुरस्कार देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे
महामानवांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प 2047 च्या विकासित महाराष्ट्राकडे जाणारा आहे, असं म्हटलं. महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे येथील सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. हे वर्ष सामाजिक समरसता वर्ष म्हणुन साजरा केला जाईल.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे, येत्या काही दिवसात काही योजना सुरु केल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
अजित पवार यांना अभिवादन
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मरण केलं. ते म्हणाले माझं अंतःकरण जड झालं आहे.
अजित दादा यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्यामुळे आर्थिक शिस्त राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणुन त्यांच भव्य स्मारक उभारल जाईल.नागरी पुरस्कार त्यांच्या नावाने सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होणार
महाराष्ट्र देशात अर्थिक अंजिन असल्याने आपला वाटा मोठा असेल. राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होणारआहे.विकसित महाराष्ट्राचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पाहायाला मिळणार आहे. राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.
प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.चार स्तंभाखाली 16 उपक्षेत्रं ठरवले आहेत. प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना,महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान,मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना,मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना या नव्या योजनांची घोषणा केली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करण्यात येणार आहे.
राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर
राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे.प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सेवा क्षेत्र
मुंबई व पुण्याला 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात २९५पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील.महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसी साठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे.4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे
शाश्वत शहरी विकास
2047 पर्यंत राज्याची नागरी लोकसंख्या 70 टक्के होईल. राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नात या घटकाचे 70 ते 80 टक्के योगदान असेल. 10 प्रादेशिक विकास प्राधिकरणे स्थापन करणे. शहरी सेवा डिजीटल करणार आहोत.बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांचं काम 2027 पर्यंत पूर्ण हेईल.तिसरी मुंबई म्हणुन उरण या परिसरात विकासकामं होतील.मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. चौथी मुंबई वाढवण येथे होईल. एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा ग्रोथ हब म्हणून विकास आराखडा तयार करण्यात येईल. नागपूर रिंगरोडला मंजुरी देण्यात आली आहे.
वाहतूक
राज्यात 1200 किलो मीटरचे मेट्रो मार्ग,6000 किमी पेक्षा जास्त लांबीचे द्रूतगती मार्ग विकसित करण्याचं नियोजन आहे. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रो मार्गिकांची कामं प्रगतीपथावर आहेत. 2029 पर्यंत 165 किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका खुल्या करण्यात येणार आहेत.
वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मुंबई मेट्रो मार्गिका 11 हा 23487 कोटी रुपये किंमतीचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पासून वांद्रे टर्मिनर्सपर्यंत करण्याचे नियोजन. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक 8 हा 22862 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग 2 मुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक व्यवस्था सुधारले. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याची योजना. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोरेगाव-मुलुंड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी 2028 पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहोत. वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात तो मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.1 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल. राज्यातील विविध विमानतळांचं विस्तारीकरण केलं जाईल. वाढवण बंदरासाठी राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्यानं निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
मच्छीमारांच्या अडचणी आणि गरजा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे आधुनिक बंदर विकसित करण्यात येईल. वाढवण बंदर प्रकल्पातून 12 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. वाढवणच्या जवळील 44 गावांतील तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवला जातोय.
उर्जा अनंतकाळ
2047 पर्यंत 75 टक्के स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचे राज्याचे धोरण, यासाठी सौर ऊर्जा, पवन आणि हरीत हायड्रो ऊर्जा प्रकल्पांना चालना दिली जात आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 2026-27 मध्येही सुरु राहणार आहे. 20 हजार कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप बसवण्यात राज्य अग्रेसर असल्यानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
शेतकरी कर्जमाफी
कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आह, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. राज्यात 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत.आणखी 25 लाख बहिणींनी लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे .
राज्यात महिमा संस्थेची स्थापना केली जाणार आहे.तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.३६ नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल.महाराष्ट्र हे देशाचे स्टार्ट अप कॅपिटल ठरले आहे.युनिकॉर्न मध्ये ही महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्रात १ लाख २५ हाजर उद्योजक घडविणे व ५० हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
आरोग्य
दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र सुरु केले जाईल.मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे.महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल. आयुष्यमान योजने 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत आजारात वाढ केली आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यानी केली.
75 हजार पदांची भरती
सातारा येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या यांच्या स्मारकांचं जतन करण्यात येईल.
राज्यातून जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग नोंदवावा यासाठी 8 हाय परफॉरमेंस केंद्र सुरू आहेत. राज्यात चार प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत.
2047 कडे वाटचाल करण्यासाठी पारदर्शक सुशासन आवश्यक वाटते. राज्यात आतापर्यंत 1 लाख 20 हजार पदांची भरती केली आहे.75 हजार पदांची पदभरती करणार आहोत.
राज्य सरकार एआयसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आहे. राज्यात जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित करणार आहोत.स्वयंचलित वाहनांसाठी नवीन धोरण आणणार आहोत. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या तत्तांवर अर्थसंकल्प सादर केला.
Comments are closed.