निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, आमदार-खासदार मैदानात
शिवसेना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून संपर्क प्रमुख म्हणून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार-खासदार मैदानात उतरणार आहेत. निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे निर्देश संपर्क प्रमुखांना पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. खासदार नरेश म्हस्के यांना ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून एकूण 40 ठिकाणी जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरेंकडून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी गरपंचायतीच्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी अनेक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. अनेक ठिकाणी जोरदार लढती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यादी
१. सिंधुदुर्ग – 1) श्री. किरण पावसकर
२) श्री. राजेश मोरे
2. रत्नागिरी – मिस्टर. यशवंत जाधव
3. रायगड ग्रामीण – श्री. संजय घाडी
4. नवी मुंबई शहर – श्री. नरेश म्हस्के
5. पालघर – श्री. रवींद्र फाटक
6. ठाणे ग्रामीण – श्री. प्रकाश पाटील
7. ठाणे शहर – श्री. नरेश म्हस्के
8. पुणे – श्री. नरेश म्हस्के
9. पिंपरी चिंचवड शहर – श्री. सिद्धेश कदम
10. पुणे ग्रामीण – 1) श्री. श्रीरंग आप्पा बारणे
2) श्री. रामभाऊ रेपाळे
11. सातारा – श्री. शरद कणसे
12. सांगली – श्री. राजेश क्षीरसागर
13. कोल्हापूर – 1) श्री. धैर्यशील माने
२) श्री. संजय मंडलिक
14. सोलापूर – श्री. संजय कदम
15. नाशिक लोकसभा – श्री. रामभाऊ रेपाळे
16. दिंडोरी लोकसभा – 1) श्री. रामभाऊ रेपाळे
2) श्री. भाऊसाहेब चौधरी
17. जळगाव- श्री. सुनिल चौधरी
18. दरबार – श्री. राजेंद्र गावित
19. धुळे – श्री. मंजुळा गावित
20. छत्रपती संभाजीनगर महानगर – श्री. विलास पारकर
21. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण – श्री. अर्जुन खोतकर
22. जालना – 1) श्री. अर्जुन खोतकर
2) श्री. भास्कर आंबेकर
23. बीड – 1) श्री. टी. पी मुंडे
२) श्री.मनोज शिंदे
24. धाराशीव – श्री. राजन साळवी
25. नांदेड – श्री. सिद्धराम म्हेत्रे
२६. लातूर – श्री. किशोर दराडे
27. बुलढाणा – श्री. हेमंत पाटील
28. परभणी – श्री.आनंद जाधव
29. नागपूर ग्रामीण- श्री. दिपक सावंत
३०. नागपूर शहर – श्री. दिपक सावंत
३१. गड चिरोली – १) श्री. दीपक सावंत
२) श्री.किरण पांडव
32. भंडारा – श्री. गोपीकिशन बाजोरिया
33. अमरावती – श्री. नरेंद्र भोंडेकर
34. वर्धा – श्री. राजेंद्र साप्ते
35. यवतमाळ – श्री. हेमंत गोडसे
36. वाशिम – श्री. जगदीश गुप्ता
37. हिंगोली – श्री. हेमंत पाटील
३८. अकोला – श्री. अभिजित अडसूळ
39. चंद्रपूर – मिस्टर. किरण पांडव
40. अहिल्यानगर -श्री. विजय चौघुले
आणखी वाचा
Comments are closed.