महापालिकेची रणधुमाळी, राज्यात कोणाची कोणासोबत लढत; कुठे युती, कुठे आघाडी? वाचा सविस्तर
Maharashtra Mahanagar Palika Nivadnuk 2026: राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहे. परिणामी जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवत त्या संदर्भातील यादी जाहीर केली आहे. फक्त हि यादी जाहीर होताच बरेच ठिकाणी मोठं नाराजीनाट्य आणि बंध सोडाriला त्याऐवजी आल्याचे बघायला मिळालंहे. तर जागावाटपाच्या वाटाघाटीमुळे महायुती, महाविकास आघाडीत मोठी राजकीय उलटापालथ होऊन युती–आघाडी फिस्कटल्याचे चित्र आहे.
दरम्यानतुमच्या महापालिकेत महायुतीतलं जागावाटप कुठवर आलंय? शिंदे आणि फडणवीसांच्या युतीत कुठेकुठे अजितदादांना एन्ट्री मिळालीय आणि कुठेकुठे बाहेर ठेवण्यात आलंय़? कुठे भाजप ऐकत नाहीय आणि कुठे शिवसेना ऐकायला तयार नाहीय? नेमकं कोण कुणाविरोधात लढणार आहे? तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Municipal Corporation Election 2026: मनपासाठी माविआ महायुतीचं कुठे ठरलं, कुठे अडलं?
मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढणार आहे. परिणामी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंचा मनसे पक्ष मुंबईत एकत्र निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने वंचितची साथ घेत मुंबई महानगरपालिकेमध्ये आपले शिलेदार उतरवले आहे.
पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युतीझाली आहे.
ठाणे महानगरपालिकेसाठी शिवसेना उबाठा गट आणि राज ठाकरेंचा मनसे पक्ष एकत्र निवडणूक लढणार असून काँग्रेसने स्वबाळाचा नारा देत एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढणार आहे. तर दुसरीकडे भाजप हा स्वबळावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
तर नागपूर मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि शिवसेना उभाटा गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे चित्र आहे.
तर परभणी मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती फिस्कटल्याची माहिती असताना अजित पवार यांची राष्ट्रवादी इथं स्वबळावर लढणार असल्याची माहिती आहे.
Pune : पुण्यात शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली, 165 जागा स्वबळावर लढणार
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती. बैठका, जागावाटप आणि उमेदवार संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बैठका देखील पार पडल्या होत्या, मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप आणि शिवसेनेची (Shivsena) युती फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेची युती होणार नाही अशी माहिती आहे. शिंदेंची शिवसेना (Shivsena) पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना (Shivsena) नेते नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे.
संजय शिरसाट : बापाचे वटवाघुळची घोषणा
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhajinagar Election 2026) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर येत आहे. भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत केली. “भाजपच्या अहंकारामुळेच युती तोडतोय,” असा थेट आरोप करत शिरसाट यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यामुळे संभाजीनगरातील शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट झाला आहे.
Akola Election 2026 : अकोल्यात भाजप-राष्ट्रवादी च्या युतीची घोषणा; तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा
अकोला महापालिकेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युतीची घोषणा झालीय. ज्यामध्ये 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी (NCP) निवडणूक लढणार, तर उर्वरित जागांवर (Akola Election 2026) भाजप उमेदवार देणारेय. या घोषणेमुळे अकोल्यात शिंदेंची सेना मात्र एकटी पडलीय. आता या महायुतीतील दोन्ही पक्षांशी शिंदोंच्या सेनेची अकोला महापालिकेत मैत्रीपूर्ण लढत पहायला मिळणारेय.
Chandrapur Elections 2026: चंद्रपूरमध्ये काँग्रेस अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती फिस्कटली; काँग्रेस सर्व जागा लढवणार
चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी अखेर फिस्कटली आहे. परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि आरपीआय (खोरिपा) यांच्यातील युतीची शक्यता देखील मावळली आहे. त्यामुळे काँग्रेस आता चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 66 जागांवर निवडणूक लढणार हे चित्र निश्चित झालं आहे.
Malegaon Election 2026: मालेगावमध्येही महायुती तुटली; भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या (Malegaon Election 2026) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. मालेगावमध्ये भाजप-शिवसेना युती तुटली असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने दिलेला जागावाटपाचा प्रस्ताव भाजपला अमान्य झाल्याने मालेगावमधील महायुती तुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.