धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेरच पैशाचं वाटप सुरु, व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगर निवडणूक राज्यात 29 महानगरपालिकांसाठी (Mahapalika) आज मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे यांसह अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. काही ठिकाणी वाद झाल्याचेही पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आमने-सामने यत असल्याचे दिसत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मतदान केंद्रा बाहेरच पैशाचे वाटप सुरु असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रा बाहेरच पैशाचे वाटप सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मधील हा प्रकार असल्याची माहिती मिळत आहे. मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव मराठी या बूथ केंद्राच्या बाहेरच पत्र्याच्या शेडमध्ये पैसे वाटप करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. जुबेर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स नावाच्या छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये चिठ्ठी घेऊन जाणाऱ्याला पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ आहे. काल याच भागात पैसे वाटपावरुन दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार समोर आला होता.
साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बृहनमुंबई महानगरपालिका – 41.08 टक्के
पुणे – 39 टक्के
ठाणे – 41 टक्केवारी
पिंपरी चिंचवड – 40.05 टक्के
कोल्हापूर – 50.85 टक्के
इचलकरंजी : 46.3टक्के
नागपूर – 37.19 टक्के
सोलापूर – 40.39 टक्के
अकोला – 43.35 टक्के
धुळे – 36.49 टक्के
परभणी : 49.16 रुपये
इचलकरंजी : 46.23 टक्के
जालना : 45.94 टक्के
नांदेड : 41.65 टक्के
अहिल्यानगर : 48.49 टक्के
नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या मुद्यावरुन वातावरण तापलं
मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात आहे. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सदर प्रकरणावरुन हल्लाबोल केला. राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण…
आणखी वाचा
Comments are closed.