राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट?
राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छूक होते अशी चर्चा होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी फारसा इच्छूक नसल्याचं समजतं.
Maharashtra Political News : राज्यातीलच व्यक्तीला मिळणार संधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेवर महाराष्ट्रातीलच स्थानिक नेत्याला संधी दिली जाणार, यावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही बाहेरील किंवा परराज्यातील चेहऱ्याऐवजी राज्यातीलच सुबोध मोहिते किंवा अविनाश आदिक यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना दिल्लीत पाठवलं जाण्याची शक्यता अधिक आहे.
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषद निवडणूक महायुती एकत्र लढणार
दुसरीकडे, राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे. विधान परिषद निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष ‘महायुती’ म्हणूनच एकत्र लढणार आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर पूर्ण एकमत झालं असून जागांच्या वाटणीची प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे.
Mahayuti Seat Sharing Formula : महायुतीचा 12-3-2 जागांचा फॉर्म्युला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या जागांसाठी महायुतीमध्ये जो फॉर्म्युला ठरत आहे, त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार आहे. महायुतीच्या प्राथमिक चर्चेत भाजप 12 जागा, शिवसेना (शिंदे गट) 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे. या फॉर्म्युल्यानुसार महायुतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड–रत्नागिरी –सिंधुदुर्गहिंगोली – परभणी
भाजप – नागपूरवर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणेजळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर
Vidhan Parishad Election 2026: निवडणूक कार्यक्रम जाहीर
अधिसूचना जारी: 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून
ही बातमी वाचा :
आणखी वाचा
Comments are closed.