विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; नि
विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान (Vidhan Parishad Election 2026) पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ लगावला आहे. या अकरापैकी तब्बल सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या बिनविरोध विजयामुळे सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. विधानपरिषदेच्या सहा बिनविरोध जागा वगळता आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026)
आज कोणकोणत्या विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडणार? (Vidhan Parishad Election 2026)
- सोलापूर,
- जळगाव,
- सांगली-सातारा,
- नांदेड,
- नागपूर,
- भंडारा-गोंदिया,
- नाशिक,
- अमरावती,
- धाराशिव-लातूर-बीड,
- परभणी-हिंगोली,
- छत्रपती संभाजीनगर-जालना
कुठे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी? (विधान परिषद निवडणूक 2026)
राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)
१. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
2. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
3. सांगली–सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
4. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
५. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
6. भंडारा–गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
७. नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )
९. धाराशिव–लातूर–बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील
देशमुख (अपक्ष)
11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
- उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
- अर्ज माघारीची मुदत- 4 जून
- मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
- मतमोजणी- 22 जून
नाशिकमध्ये सगळ्यांचं लक्ष- (Nashik Vidhan Parishad Election 2026)
नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह माघार घेतलेले गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांचीही नावे मतपत्रिकांवर असल्याने निवडणुकीत माघारीनंतरही रंगत आहे. महायुतीचे उमेदवार ठाणे येथे सहलीसाठी गेल्यानं एकत्र मतदानाला येतील, तर महाविकास आघाडीचे मतदार ही सकाळ पासूनच मतदानाला येणार आहे. महापौर, उपमहापौर, गणेश गिते यांच्यां पत्नी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.