विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, मुलाच्या उ

मुंबई :  राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे  आमदार अर्जुन खोतकर हे आज(मंगळावारी, ता26) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत.  शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे हिंगोली परभणीच्या (Hingoli Parbhani) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरती दावा करत आहेत. त्यांच्या मुलासाठी अभिमन्यू खोतकर यांच्यासाठी ते ही जागा मागत आहेत. याच अनुषंगाने ते सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील नेत्यांकडून, मंत्र्यांकडून, आमदारांकडून आपल्या नातेवाईक, मुलांसाठी लॉबिंग सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे.(Vidhan Parishad Electrion 2026 Hingoli Parbhani)

महायुतीचे जागावाटप अद्याप ठरलेलं नाही. अद्याप जागावाटपाबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत. या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ३ जागांची मागणी केलेली आहे. यामध्ये हिंगोली परभणी, पुणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन विधान परिषद मतदारसंघांची मागणी केलेली आहे. अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसला तरी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर  हिंगोली परभणीची जागा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी अर्जुन खोतकर देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत, ते त्यांच्या मुलासाठी अभिमन्यू खोतकरांसाठी ही जागा मागत आहेत, मात्र, या भेटीमध्ये काय निर्णय होईल, काय चर्चा होईल हे पाहणंही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी ही जागा सोडेल का यावरती देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषद निवडणूक 2026 : भेटीनंतर काय म्हणाले खोतकर?

आज कॅबिनेटचा दिवस आहे, मी मतदार संघातली काम मार्गी लावण्यासाठी आलो आहे. मी कामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. माझी मुलगी नाही तर  मुलगा अभिमन्यू निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आमच्या संदर्भात काय आहे ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील, पक्ष उमेदवारीबाबत ठरवेल असंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.

Vidhan Parishad Election 2026 :  विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटणार

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महायुतीची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक व संभाजीनगरवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूरअहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणेभंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून

आणखी वाचा

Comments are closed.