अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवता सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ

अकोला : मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी (निवडणूक) मतदानाला सुरुवात झाली असून सकाळच्या टप्प्यात मतदानाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. मात्र, आता मोठ्या संख्येनं नागरिक मतदानासाठी बाहेर पडत आहेत. सकाळी 11.30 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार, राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत 17.58 टक्के मतदान झालं आहे. एकीकडे सकाळपासूनच काही मतदान केंद्रावरुन तक्रारी येत असल्याचे दिसून येते. कुठे दुबार मतदाना, कुठे मतदानानंतर (Voting) बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. तर, मुस्लिम बहुल भागात मतदानासाठी पदनाशीं ठेवण्यात आलं आहे. मात्र, अकोल्यात (Akola) पदनाशीं प्रक्रियेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून येते.

राज्यातील मुस्लिमबहुल आणि इतर मतदान केंद्रांवर निवडणूक विभागाने ‘पदनाशीं‘ महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पडदा आणि बुरखादारी महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी किंवा स्त्री कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीये. दुबार आणि बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक विभागाने ही व्यवस्था केलीये.‌ मात्र, अकोल्यात निवडणूक आयोगाच्या या व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुरखाधारी महिला मतदारांचं अधिक प्रमाण असलेल्या मतदान केंद्रांवर या महिलांना कोणतीही ओळख न पटवता मतदान केंद्रावर आतमध्ये सोडलं जात असल्याचे चित्र ‘एबीपी माझा’च्या कॅमेरात कैद झालं आहे. शहरातील भांडपुरा भागातील प्रभाग क्रमांक 17 च्या सर्वच मतदान केंद्रांवर ही परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे निवडणूक आयोगाने मोठा गाजावाजा केलेली ही व्यवस्था पूर्णत: आणि सपशेल अयशस्वी ठरल्याचे चित्र समोर आलं आहे.

दरम्यान, आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी साडे पाच वाजेपर्यंत दरम्यान नागरिकांना मतदान करता येणार आहे. राज्यातल्या एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होतेय. तर एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 39 हजार 92 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. राज्यात एकूण 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत.

महानगरपालिकांमध्ये 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?

बृहन्मुंबई महानगरपालिका : 17.58 टक्के

पुणे – 10.50 टक्के

नवी मुंबई– 15 टक्के

कोल्हापूर : 22.45 टक्के

इचलकरंजी – 18.57 टक्के

पिंपरी चिंचवड – 16.03 टक्के

संभाजीनगर – 16 ते 17 टक्के

नाशिक – 14.31 टक्के

सांगली मिरज कुपवाड महापालिका – 17.20 टक्के

सोलापूर : 18.08 टक्के

अहिल्यानगर : 20.16 टक्के

जळगाव शहर : 13.39 टक्के

धुळे : 14.23 टक्के

नागपूर : 12 टक्के

पनवेल : 17 टक्के

मालेगाव – 20.92 टक्के

जालना – 20.13 टक्के

अमरावती – 17.02 टक्के

शाई पुसून मतदान केल्यास कारवाई

दरम्यान, बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

हेही वाचा

मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, ‘सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय’

आणखी वाचा

Comments are closed.