अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; प्रभारी धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६: सोलापूर महापालिकेसाठी (Solapur Mahapalika Election) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून मिशन सोलापूर महापालिका सुरू झाले आहे. सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्या संदर्भात चर्चा सुरू झाल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी सांगितले आहे. सोलापूर महापालिकेसाठी जर अजित पवार गटाकडून प्रस्ताव आल्यास त्यांनाही आघाडीत सामील करून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यानयाबाबत वरिष्ठांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अजितदादा पवारांच्या (Ajit Pawar)सोबत जाण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dhairyasheel Mohite Patil : अजित पवारांचा पक्षाकडूनही आघाडीचा प्रस्ताव भाजपला रोखण्यासाठी आघाडी
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता सोलापूर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिलीं आहे. यानंतर पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोलापूर शहरात देखील मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे बेरजेचे राजकारण करण्यासाठी मोहिते पाटील पॅटर्न सोलापूर महापालिकेत राबवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्लॅन आहे. त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाशी चर्चा सुरू केली आहे. यात जर अजित पवारांचा पक्षाकडूनही आघाडीचा प्रस्ताव आल्यास भाजपला रोखण्यासाठी त्यांचे सोबत आघाडी केली जाईल असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
NCP (RSP) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारींची नावे जाहीर
१) कोकण विभाग
मुंबई- रोहित पवार
ठाणे– जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई– शशिकांत शिंदे
उल्हासनगर- जितेंद्र आव्हाड
कल्याण डोंबिवली- मुलांचे मामा म्हात्रे
भिवंडी निजामपूर- बाळ्या मामा म्हात्रे
मीरा- भाईंदर- जितेंद्र आव्हाड
पालघर जिल्हा – वसई विरार- सुनील भुसारा
रायगड जिल्हा – पनवेल – शशिकांत शिंदे
नाशिक विभाग
नाशिक– सुनील भुसारा
मालेगाव- भास्कर भगरे
अहिल्यानगर- निलेश लंके
जळगाव– संतोष चौधरी
धुळे- प्राजक्त तनपुरे
पुणे विभाग
पुणे– सुप्रिया सुळे
पिंपरी चिंचवड– रोहित पवार, अमोल कोल्हे
सोलापूर– धैर्यशील पाटील
कोल्हापूर- हर्षवर्धन पाटील
इचलकरंजी- बाळासाहेब पाटील
सांगली– जयंत पाटील
छत्रपती संभाजीनगर विभाग
छत्रपती संभाजीनगर– बजरंग सोनवणे
नांदेड- जयप्रकाश दांडेगावकर
परभणी- फौजिया खान
जालना- राजेश टोपे
लातूर– विनायक पाटील
अमरावती विभाग
अमरावती– रमेश बंग
अकोला– राजेंद्र शिंगणे
नागपूर विभाग
नागपूर– अनिल देशमुख
चंद्रपूर– अमर काळे
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.