मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदतकार्याच्या स्थितीचा आढावा; सर्व अधिकार्यांना प्रत्यक्ष फिल
मुंबई: मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान (Marathwada Heavy Rain) घातले. पुन्हा मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं गडद सावट (Marathwada Heavy Rain) निर्माण झालं आहे, नदी, नाले यांनी प्रवाह बदलला आहे, शेतशिवारात, घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी, हिंगोलीमध्ये कयाधू, बीड, लातूर आणि धाराशिवमधून जाणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा पूर आला. या पावसाळ्यात मराठवाड्यातील २८५७ गावांत शेती बाधित झाली आहे. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात पावसाने ९० बळी घेतले आहेत. अनेक भागांत राष्ट्रीय आपत्ती निवारण (Marathwada Heavy Rain) पथकास बोलवावे लागले. पुन्हा एकदा परंडा तालुक्यास पुराने झोडपले. नांदेड, बीड शहरात पाणी घुसले. शाळा आणि अगदी पोलीस ठाण्यापर्यंत पाणी शिरले. मराठवाड्यात लातूर, नांदेड जिल्ह्यातील शाळा व शिकवणी वर्गास शनिवारी सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आढावा घेतला आहे.
Devendra Fadnavis: जिल्हाधिकार्यांशी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा
याबाबतची पोस्ट फडणवीसांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात असलेल्या उपाययोजना जाणून घेत त्यांना काही सूचनाही केल्या. मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्याच्या योग्य व्यवस्था राखण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. काही जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने तातडीने चारा पुरवण्याचेही आदेश दिले आहेत.पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढविले जात असताना नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सुद्धा त्यांनी सांगितले आहे.सर्व अधिकार्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर राहून काम करावे, अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेडधाराशिव, परभणी हे 8 जिल्हे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांशी आज सकाळी संपर्क करुन पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
प्रत्येक ठिकाणी मदतकार्यात केल्या जात…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) 28 सप्टेंबर, 2025
Devendra Fadnavis: स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात झालेल्या सुमारे 150 मि.मी. पावसामुळे 1,25,000 क्युसेक इतका गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे, हा विसर्ग दीड लाख क्युसेकपर्यंत जाऊ शकतो, अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली. माजलगाव धरणातून 41,701 क्युसेक इतका विसर्ग, हा पूर्वी 95,000 क्युसेक इतका होता, तो आता कमी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. धाराशिव, सोलापूरअहिलीनगर, बीड येथील पावसाने सीना कोळेगाव येथून 75,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. उजनीमधून 1 लाख क्युसेक इतका विसर्ग होत असल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती आहे. ही माहिती सकाळी 9 वाजतापर्यंतची असल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis: आज पुन्हा मुसळधार; सहा जिल्ह्यात रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्रकडे आगेकूच करत असून, हवामानातील या बदलामुळे रविवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात असलेली पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात रविवारी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले.
Heavy Rain: आज कुठे ‘अलर्ट’?
लाल: मुंबई, ठाणेपालघर, रायगडपुणे आणि नाशिक जिल्ह्याचा घाटमाथ्याचा परिसर
केशरी: रत्नागिरीसिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा परिसर
सोमवारी ‘रेड अलर्ट’
पालघर आणि नाशिकचा घाटमाथ्याचा परिसर
आणखी वाचा
Comments are closed.