पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्
महापालिका निवडणूक: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महानगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीच्या आधी घेण्याचं नियोजन आहे. एकूण ३.४८ कोटी मतदार आहेत. ३९१४७ मतदार केंद्र असतील. १०१११ मुंबईसाठी मतदार केंद्र असणार आहे. ११३४९ कंट्रोल यूनिट असणार आहे. २२००० बॅलेट यूनिट असतील अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांसह पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे.(maharashtra municipal corporation election)
महानगरपालिका निवडणूक 2025: पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण जागा
- पुणे – 162
- पिंपरी-चिंचवड – 128
Municipal Corporation Election 2025: असा असेल कार्यक्रम
⦁ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
⦁ अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
⦁ उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
⦁ चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
⦁ मतदान – 15 जानेवारी
⦁ निकाल – 16 जानेवारी
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माहिती देताना सांगितलं की, राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे. राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारीला मतदान होईल, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
महानगरपालिका निवडणूक यादी : निवडणूक खर्चाची मर्यादा
अ वर्ग निवडणूक खर्च १५ लाख
ब वर्ग 13 लाख
एक चौरस 11 लाख
d चौरस 9 लाख
Municipal Corporations Election List : कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
1. बृहन्मुंबई – 227
2. भिवंडी-निजामपूर – 90
3. नागपूर – १५१
4. पुणे – १६२
५. ठाणे – १३१
6. अहमदनगर – ६८
७. नाशिक – १२२
8. पिंपरी-चिंचवड – 128
९. औरंगाबाद – 113
10. वसई-विरार – 115
11. कल्याण-डोंबिवली – 122
12. नवी मुंबई – 111
13. अकोला – 80
14. अमरावती – ८७
१५. लातूर – 70
16. नांदेड-वाघाळा – 81
17. मीरा-भाईंदर – 96
18. उल्हासनगर – 78
19. चंद्रपूर – ६६
20. धुळे – 74
२१. जळगाव – 75
22. मालेगाव – 84
23. कोल्हापूर – ९२
२४. सांगली-मिरज-कुपवाड – 78
२५. सोलापूर – 113
26. इचलकरंजी – 76
27. जालना – 65
28. पनवेल – 78
29. परभणी – ६५
आणखी वाचा
Comments are closed.