शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शह

पुणे : पुण्यातील विधानपरिषद निवडणूकीतुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant jagtap) यांनी या निर्णयावर टीका केली आहे. विधानपरिषदेची ही जागा कॉंग्रेसने लढवायला हवी होती, मात्र राष्ट्रवादीवर विश्वास ठेऊन महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने आमचा विश्वासघात झाल्याच प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. प्रशांत जगताप हे काही महिन्यांपुर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कॉंग्रेसमधे दाखल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  (Prashant jagtap)

प्रशांत जगताप : काय म्हणाले प्रशांत जगताप?

प्रशांत जगताप म्हटलं की, “पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूणच जे काही विरोधक आहेत, त्यांची भाजप किंवा महायुती सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी होती. इथं आमच्या काँग्रेस पक्षाचा आकडा हा सगळ्यात मोठा होता. काँग्रेस पक्षाने या जागेवर दावा केला होता. प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्यासोबत सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या १७ जागेमध्ये ‘फक्त आम्हाला दोनच जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची’ अशा प्रकारे मागणी केल्यामुळे, काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली.

त्यावेळेस सुद्धा आमचं या ठिकाणी आग्रही मत होतं की, या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मतदारांची संख्या यामध्ये जास्त होती. पण दुर्दैवाने या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने याच्यामध्ये आग्रही भूमिका घेतली, त्यामुळे काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली. पण या ठिकाणी आम्हाला धोका झालेला आहे. ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस, भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेर माघारी सुद्धा घेतला. हा आमचा एक विश्वासघात आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा हा विश्वासघात झालाय अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे. इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

vidhan parishad election 2026 : विधानपरिषदेला कुठे बिनविरोध, कुठे लढती, 17 जागांचं संपूर्ण चित्र

१. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)

3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

4. सांगलीसातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

५. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

6. भंडारागोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)  विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

७. नाशिक :  गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध  नरेंद्र दराडे  (शिवसेना)

8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा  (वंचित )

९. धाराशिवलातूरबीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)

11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

12. नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

vidhan parishad election 2026 : बिनविरोध विजयी उमेदवार

१.वर्धागडचिरोलीचंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
4.रायगड-रत्नागिरीसिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
५.यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.