निकालाआधीच भाजपकडून पुण्यात विजयाचे फ्लेक्स, सचिन दोडकेंचा थेट भावी आमदार म्हणून उल्लेख

पुणे महापालिका निवडणूक 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे तर काही ठिकाणी पैसे वाटप करुन गेल्यासह मतदान करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं आहे. दरम्यान, मतदान झाल्यानंतर निकालापूर्वीच पुण्यात विजयाचे फ्लेक्स लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील प्रभाग क्रमांक 32 चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांचे विजयी फ्लेक्स लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश देऊनही लागले फ्लेक्स

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे, यानंतर सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. उद्या राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र, पुण्यात त्यापूर्वीच विजयांचे फ्लेक्स लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यातील प्रभाग क्रमांक 32 चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांचे विजयी फ्लेक्स लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांना फ्लेक्स लावू नका असे आदेश दिल्यानंतर सुद्धा विजयी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. प्रभाग 32 मधील नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सचिन दोडके यांचे थेट भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. सचिन दोडके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत केला भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरात मतदानाचा टक्का घसरला

मुंबईसह महत्त्वाच्या शहरात मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं. मुंबई) दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले असून मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड 227 मध्ये दुपारी 3.30 पर्यंत फक्त 15.73 टक्के मतदान झाले आहे. कदाचित हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड असू शकेल. दरम्यान, 5.30 वाजेपर्यंतची मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी वेळ लागू शकतो, त्यानंतर, अंतिम टक्केवारी अपडेट केली जाईल. राज्यात 9 वर्षानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांसाठीच्या मतदानासाठी यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं आहे. सोलापूर महापालिकेतही मतदान टक्का घसरणार असल्याचे दिसून येते, 52 ते 55% मतदानाचा अंदाज व्यक्त होत आहे. सोलापुरात ३.३० वाजेपर्यंत 40.39 टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान?

बृहन्मुंबई महानगर पालिका: ४१.०८ टक्के

ठाणे : ४३.९६

कल्याण डोंबिवली : ३८.६९

नवी मुंबई४५.५१ टक्के

उल्हासनगर : ३४.८८

भिवंडी निझामपूर – ३८.२१

मीरा भाईंदर : ३८.३४

वसई विरार : ४५.७५

पनवेल : ४४.०४

नाशिक : ३९.६४

मालेगाव : ४६.१८

धुळे : ३६.४९

जळगाव : ३४.२७

अहिल्यानगर : ४८.४९

पुणे३६.९५ टक्के

पिंपरी चिंचवड40.50 टक्के

सोलापूर : 40.39

कोल्हापूर : ५०.८५

सांगली मिरज-कुपवाड : ४१.७९

आहे संभाजीनगर : ४३.६७

नांदेड वाघाळा : ४२.४७

लातूर : ४३.५८

परभणी : ४९.१६

अमरावती : 40.62

अकोला : ४३.३५

नागपूर : ४१.२३

चंद्रपूर : ३८.१२

इचलकरंजी : ४६.२३

जालना : ४५.९४

महत्वाच्या बातम्या:

मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

आणखी वाचा

Comments are closed.