दगडू सकपाळ, गोगावले, सामंत, आबिटकर; निवडणुका संपताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये, शिवसेना आमदार
Shiv Sena मराठी: महाराष्ट्रातील निवडणुकांचे (Elections) वारे शांत होत नाहीत तोच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे.
त्यानुसार पक्षाच्या वतीने लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध विभागांची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे : शिवसेना विभागीय संपर्कप्रमुख
1 दक्षिण कोकण – (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) : किरण सामंत
2 उत्तर कोकण – (रायगड आणि पालघर): भरतशेठ गोगावले
3 पश्चिम महाराष्ट्र – (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर): दगडू दादा सकपाळ
4 मराठवाडा – (धाराशिव, लातूर, बीड आणि नांदेड): प्रकाश आबिटकर
5 पूर्व विदर्भ – (नागपूरभंडारा आणि गोंदिया): डॉ. दीपक सावंत
६ पूर्व विदर्भ – २ (वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली): डॉ. मनीषा कायंदे
7 पश्चिम विदर्भ – (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा): संजय राठोड
शिवसेना एकनाथ शिंदे : शिवसेना विभागीय सहसंपर्कप्रमुख
1 उत्तर कोकण – (रायगड आणि पालघर): प्रदीप (भाई) खाडे
2 पश्चिम महाराष्ट्र -(पुणेसातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर): हनुमंत जगदाळे
3 पश्चिम विदर्भ – (अमरावती, अकोलावाशिम, यवतमाळ, बुलढाणा): पराग पिंगळे
शिवसेना मराठी: एकनाथ शिंदेंचा 'भावी प्लॅन'
निवडणुका संपल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना तातडीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची पकड अधिक घट्ट करणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि संघटनात्मक बांधणी करणे, हे या नियुक्त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे.
मराठी: ‘ऑपरेशन तुतारी’ला ब्रेक; भाजपकडून एकनाथ शिंदेंना रेड सिग्नल
दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’ राबवण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ शिंदेंना भाजप हायकमांडकडून सध्या ब्रेक लावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तुतारी गटातील खासदारांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास ते सुनेत्रा पवार यांच्या पक्षामार्फत यावेत, असा सल्ला भाजपकडून देण्यात आल्याचे समजते.
शिंदे गटाकडून तुतारीचे 6 आणि उबाठाचे 6 असे एकूण 12 खासदार फोडण्याची रणनीती आखली होती. या योजनेनुसार शिंदेंकडे एकूण 19 खासदारांचे संख्याबळ निर्माण करून राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर दावा करण्याचा विचार होता. मात्र, या संपूर्ण रणनीतीला भाजपकडून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. दरम्यान, शिंदेंच्या मागील दिल्ली दौऱ्यात अमित शाह यांनी त्यांना भेट दिली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.