विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 चे निकाल: गेले काही आठवडे महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज (२२ जून) होणार आहे. राज्यातील 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 6 जागांवर बिनविरोध निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) झाल्यामुळं उरलेल्या 11 ठिकाणांचे निकाल आज जाहीर होतील. कागदावर मजबूत असणाऱ्या महायुतीसमोर विरोधकांपेक्षाही बंडखोरांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला यश आलं असलं तरी अंतिम निकालाकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे. त्यामुळे मतदारांच्या शेवटचा कौल नेमका कोणाला हे आज कळू शकणार आहे. (विधान परिषद निवडणूक 2026 निकाल)

दरम्यानजागावाटपापासून ते बंडखोरीपर्यंत अनेक कारणांनी गाजलेल्या महाराष्ट्रातल्या विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज (सोमवारी) होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीतील सुमारे एक तृतीयांश जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेलेत. त्यामुळे निकालाची उत्कंठा असणार आहे ती उरलेल्या 11 जागांसाठी. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आलं होतं. मात्र हे आवाहन फेटाळून लावत सर्व ठिकाणी निवडणूक लढवण्याचा इरादा महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मविआच्या एकूण आठ उमेदवारांनी स्वतःहून मैदान सोडल्यामुळं चांगलीच नाचक्की झाली.

कुठे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी?

ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना

यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना

रायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस

वर्धागडचिरोलीचंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप

अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप

आज कोणकोणत्या विधान परिषदेच्या जागेसाठी बाहेर काढणे लागणार? (विधान परिषद निवडणूक 2026 निकाल)

  • सोलापूर,
  • जळगाव,
  • सांगली-सातारा,
  • नांदेड,
  • नागपूर,
  • भंडारा-गोंदिया,
  • नाशिक,
  • अमरावती,
  • धाराशिव-लातूर-बीड,
  • परभणी-हिंगोली,
  • छत्रपती संभाजीनगर-जालना

कुठे किती टक्के मतदान झाले? (Vidhan Parishad Election 2026 Result)

मतदारसंघ मतदानाची टक्केवारी
नाशिक 100%
भंडारा – गोंदिया 100%
सांगली – सातारा 99.89%
परभणी – हिंगोली 99.78%
सोलापूर 99.68%
धाराशिव – लातूर – बीड 99.49%
छत्रपती संभाजीनगर – जालना 98.90%
नागपूर 98.44%
जळगाव 97.78%
अमरावती 94.68%

राज्यातील 11 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)

१. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

2. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)

3. सांगलीसातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)

4. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)

५. नागपूर (पोटनिवडणूक) :  डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)

6. भंडारागोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)  विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

७. नाशिक :  गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध  नरेंद्र दराडे  (शिवसेना)

8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा  (वंचित )

९. धाराशिवलातूरबीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील

देशमुख (अपक्ष)

11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)

नागपूर विधान परिषद मतदारसंघ : प्रमुख उमेदवार ( Nagpur Vidhan Parishad Election 2026)

१) राजीव पोतदार, भाजप
२) अतुल लोंढे, काँग्रेस

एकूण मतदार 836
झालेले मतदान 823

भाजप-  520
शिवसेना – 30
अजित पवार गट – 9
भाजप समर्थित अपक्ष 20
महायुती 579
——————————————————–

काँग्रेस – 170
शरद पवार – ९८
शेकाप 11
उद्धव सेना 11
MVA – 211

अपक्ष – 46

नागपुरात विजयी उमेदवारासाठी पहिल्या पसंतीच्या मतदानाचा कोटा – 412

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.