विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकांची (Election) घोषणा झाली असून पुढील महिन्यात मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महायुती म्हणूनच एकत्र जागा लढवण्याचा निर्धार महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केलाय. त्यात अनुषंगाने जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, अद्यापही अंतिम तोडगा निघालेला नाही. भाजपकडून 12, शिंदेंच्या शिवसेनेकडून 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. त्याचसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यानंतरच, जागावाटप आणि अंतिम उमेदवारी निश्चित होईल, असे सांगण्यात येते. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर आता, 17 विधान परिषद (विधान परिषद) मतदारसंघांचा आढावा घेतल्यास 14 ठिकाणी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येते.
राज्यातील 17 पैकी 14 मतदारसंघात भाजपकडे बहुमताचा जादुई आकडा असल्याने भाजपच मोठा भाऊ असल्याचे दिसून येत आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि राष्ट्रवादीला परभणी-हिंगोली मतदारसंघात बहुमत आहे. त्यामुळे, येथील दोन मतदारसंघात दोन्ही पक्षांची दावेदारी आहे. याशिवाय पुणे मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. मात्र, महायुती म्हणून सामंजस्य भूमिका घेऊन तोडगा काढला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे.
पुण्यात एकटा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मोठा दिसत असला, तरी भाजप-शिवसेनेकडे पुण्यात राष्ट्रवादीहून अधिक मते आहेत. पुण्यात भाजप व शिवसेना एकत्रित आहे, तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे पुण्यावर भाजपने दावा केला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेकडे अधिक मत असूनही हा मतदारसंघ अनिकेत तटकरेंसाठी राष्ट्रवादीकडून मागितला जात आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या बदल्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे परभणी-हिंगोली जागेची मागणी केली जात आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आकडेवारी पाहिली असता राष्ट्रवादीच्या वाट्याला एक, शिवसेनेच्या वाट्याला एक आणि 15 जागा भाजपच्या वाटेला येऊ शकतात. मात्र, राज्यात मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला व शिवसेनेसोबत युतीत लढल्यामुळे भाजपने शिवसेनेला एका ऐवजी 4 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
राज्यात 17 पैकी कुठल्या मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे?
ठाणे –
एकूण मते – ९९७
भाजप – ४३१
शिवसेना – ३०९
राष्ट्रवादी – १८
2. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग
एकूण मते – ८२३
भाजप – २४१
शिवसेना – २७५
राष्ट्रवादी – १४९
3. अहिल्यानगर –
एकूण मते – ४५२
भाजप – २०७
शिवसेना – ४४
राष्ट्रवादी – ६४
4. जळगाव –
एकूण मते – ६६७
भाजप – २७४
शिवसेना – २०८
राष्ट्रवादी – ५५
५. नाशिक –
एकूण मते – ६०३
भाजप – १८६
शिवसेना – १६१
राष्ट्रवादी – १०७
6. सोलापूर –
एकूण मते – ६१७
भाजप – ३०४
शिवसेना – ७६
राष्ट्रवादी – ४८
७. सांगली सातारा
एकूण मते – ८९८
भाजप – ३७१
शिवसेना – ११०
राष्ट्रवादी – १४५
8. पुणे –
एकूण मते – ८७८
भाजप – ३३५
शिवसेना – ८२
राष्ट्रवादी – ३७५
९. यवतमाळ –
एकूण मते – ४४६
भाजप – १३५
शिवसेना – १०४
राष्ट्रवादी – २९
10. भंडारा गोंदिया –
एकूण मते – ४३६
भाजप – १९६
शिवसेना – १५
राष्ट्रवादी – ८३
11. वर्धा चंद्रपूर गोंदिया
एकूण मते – २६४
भाजप – १४९
शिवसेना – १
राष्ट्रवादी – १५
12. अमरावती –
एकूण मते – ४४९
भाजप – १३६
शिवसेना – २३
राष्ट्रवादी – ८३
13. नांदेड –
एकूण मते – 403
भाजप – 103
शिवसेना – २३
राष्ट्रवादी – ८३
14. धाराशिव लातूर बीड
एकूण मते – ९०४
भाजप – ३७९
शिवसेना – ८०
राष्ट्रवादी – २०२
१५. परभणी हिंगोली –
एकूण मते – ४७३
भाजप – १११
शिवसेना – ७४
राष्ट्रवादी – १२३
16. छत्रपती संभाजी नगर – जालना
एकूण मते – ६४६
भाजप – २५४
शिवसेना – १३९
राष्ट्रवादी – ८६
१७. नागपूर –
एकूण मते – ७९४
भाजप – ५०१
शिवसेना – ३०
राष्ट्रवादी – ५
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.