कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…
अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणूक 2026 वर सुनेत्रा पवार: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी काल (5 मे) अखेरचा दिवस होता. पाच ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेतून (Konkan Vidhan Parishad Election 2026) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांची बिनविरोध निवड झाली. अखेरच्या क्षणी शिवसेना महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गट) उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने (Bal Mane) यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाची मार्ग मोकळा झाला. अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजय झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. यानतंर सुनेत्रा पवारांनी एक्सवर पोस्ट करत अनिकेत तटकरेंच्या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली.
सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? (Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026)
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी देवगिरी या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, असं ट्विट सुनेत्रा पवार यांनी केलं.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर श्री. अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मा. श्री. सुनील तटकरे यांनी देवगिरी या निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अनिकेत तटकरे यांच्या… pic.twitter.com/5nYXsLB0Wq
– सुनेत्रा अजित पवार (@SunetraA_Pawar) 4 जून 2026
अनिकेत तटकरे काय म्हणाले? (Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026)
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेसुनेत्रा पवार तसेच सुनील तटकरे महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारी आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहीन. जनसेवा, विकास आणि लोकहिताच्या कार्यासाठी सदैव कटिबद्ध राहून आपण सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, अशी पोस्ट अनिकेत तटकरे यांनी केली आहे.
बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांची नावं- (Names of candidates elected unopposed)
१.वर्धा–गडचिरोली–चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
2.पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
3.ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
4.रायगड-रत्नागिरी–सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
५. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
राज्यातील 12 मतदारसंघातील प्रमुख लढती, आमन-सामने कोण? (Vidhan Parishad Election 2026)
१. सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
2. अहिल्यानगर -प्राजक्त तनपुरे (भाजप) विरुद्ध दत्तात्रय पानसरे (अपक्ष)
3. जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध रेश्मा काळे (शिंदेंची शिवसेना बंडखोर)
4. सांगली–सातारा : धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
५. नांदेड : अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
6. भंडारा–गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
७. नाशिक : गोकुळ गीते (अपक्ष) विरुद्ध नरेंद्र दराडे (शिवसेना)
8. अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित )
९. धाराशिव–लातूर–बीड : बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
10.परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष)
11. छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना)
12. नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
संबंधित बातमी:
मोठी बातमी: विधानपरिषद मतदानाआधीच महायुतीचा धुरळा, 17 पैकी 8 जागा बिनविरोध, मविआला धक्क्यावर धक्के!
आणखी वाचा
Comments are closed.